सोहळा

wp-1461069393841.jpeg

प्राशून ऋतू नक्षत्रांचे,
तारुण्य वर्षितो आहे,
उत्फुल्ल मनाच्या डोही,
अवघा खेळ मांडतो आहे!

निळ्या सूरांच्या नक्षी,
कोरून रात्रीच्या देही,
मोहरल्या प्रीतीची सुमने,
या गगनात माळतो आहे!

स्पर्शाचे डंख हे गहिरे,
आसमंत झेलतो आहे,
विरघळल्या देहांभोवती,
सृष्टीचा श्वास कोंडतो आहे!

जपणार कशी तू सखये,
ही धुंद सुगंधी स्मरणे,
पौर्णिमेच्या काठावरुनी,
तो चंद्र सांडतो आहे!!!!

4 thoughts on “सोहळा

  1. कवितेत जरी असेल चंद्र सांडला ,
    आजपर्यंत अश्या शब्दात त्याला कोणीच नव्हता मांडला……………!

    Like

Leave a comment