जमात

wp-1463564269071.jpegकसली जमात आहे आपली..
नेमक्या कुठल्या जगात वावरतोय आपण..
सडक्या विचारांच्या वळण वाटा
नेमकं कुठे घेऊन जाणार आहेत…

ही कसली दाटून येतेय भीती
अवघ्या मेंदूच्या आरपार..
कुठलाच अभिनिवेश न बाळगता
सणसणत येणारी बंदुकीची गोळी नि लक्ष्यभेद..
मेंदूत तडतडणाऱ्या धमन्यांसकट
हातातील लेखणी थंडावते..
समाजाच्या षंढत्वाची ग्वाही देणारी
काळी रेघ चिरंतन होते..
ही कसली जमात आहे आपली?

हे कसलं अराजक आहे..
दिवसाढवळया सहिष्णुतेचे पाडले जातात
निर्घृण खून,
रक्ताच्या रंगालाही चिकटवतात धर्माचे लेबल
घडवल्या जातात लेबलच्या आधारे दंगली..
त्रिशूल नि तलवारीच्या आवाजात
प्रार्थनांचे सूर मौन होतात..
उन्मादाच्या नग्न तांडवात माणुसकी शहीद होते..
तिरंग्यातला पांढरा रंग असहायपणे डोळे पुसतो..
ही कसली जमात आहे आपली?

ही कसली विमनस्कता आहे
आतला विवेकाशी प्रामाणिक राहता यावं म्हणून
गरज भासते प्रतिमेची चौकट भेदण्याची,
काळाच्याही कानठळया बसवणाऱ्या
प्रतिभास्फोटाची..
निषेधाचे शाब्दिक बुडबुडे
तसेही ‘त्यांना’ नाहीच ऐकू येणार..
डोळ्यावर कातडं ओढून
घेतलेल्यांकडून काय अपेक्षा…
कुठे तरी फुटेल का
छोटंसं अंकुर या वाळवंटात..
ही कसली जमात आहे आपली??

Advertisements

2 thoughts on “जमात

  1. “उन्मादाच्या नग्न तांडवात माणुसकी शहीद होते..
    तिरंग्यातला पांढरा रंग असहायपणे डोळे पुसतो..”
    एकदम सटीक … Too good.
    त्या प्रतीभास्फोटाच्या आशेवरच सगळ काही आहे ..

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s