प्रायश्चित्त


एकवार माफ करेन स्वत:ला,

जर्द तांबडया प्रभात समयी

लालचुटूक पानांवरचे

चिंब ओलेते दवबिंदू

डोळ्यांनी प्राशन करायचे राहून गेल्यास….

किंवा हजारो उल्का,चांदण्या,ताऱ्यांना

चुकवत,ऐन पौर्णिमेच्या रात्री,

चंद्र माझ्या अंगणात पाऊल टाकतो,

तेव्हा त्याची दृष्ट काढायची राहून गेल्यास…

अथवा,उन्मत्त नभांच्या तांडवात

पारावरच्या शांत तेवणाऱ्या

कोवळ्या पणतीचा जीव व्याकुळ होतो,

तेव्हा उरातला अंगार तिच्या ओंजळीत

टाकायचे राहून गेल्यास…

मात्र,

जगाच्या रहाटगाड्यात,

केवळ क्षुद्र स्वार्थापोटी,

अलगद उमलून आलेल्या

शेकडो कवितांच्या गर्भपाताला,

कारणीभूत असल्यास..कसे माफ करणार??

या पापाचे प्रायश्चित्त सांगेल कुणी???

Advertisements

11 thoughts on “प्रायश्चित्त

  1. tanvir ji…translation of this poem posted by you under ther article’s comment section.. is right… but partially…!!I must appreciate your work…it’s a glad feeling for me to get such praise!!thanks again!!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s