ओमरान

गौर से देखिएगा..

इस बच्चे की मासूमियत पे

किसने उछाला है लाल रंग..

हाथ पाँव पे सजे ये काले 

नीले धब्बे किसकी देन हैं..

वीराँ वीराँ सी आँखें किस शून्यता

की गहराई तलाश कर रही हैं..

क्या किसी खामोश,शातिर

शैतानों के साये मंडराते नहीं दिखते

इस बच्चे के सोचो हवास पर..?

दर्द के सारे एहसास पी रखे हैं

इस बच्चे की रूह ने,

आँसुओं की बूँद भी टपकी नहीं,

जो मंजर देखा है उसकी आँखों ने,

शायद ही कभी भूलेगा वह..

सीरिया..रशिया..इजराइल..पॅलेस्टाइन..

कितने मुल्कों के कितने झगडे,

कितने बम बारूद,कितनी जानें,

किस मज़हब की कौनसी किताबें

ऐसा सबक़ सिखाती हैं..

कैसे बींज बो रहें हैं हम

बच्चों के दिलों में..

कितनी नफरत भरी पडी है

इस जहाँ के सियासतों में..

ये सिर्फ अकेले ओमरान की तस्वीर नहीं है,

हमारी आने वाली पुश्तों का 

जीता जागता आईना है..

ये बच्चा कल किसी लाशों के

ढेर का ज़िम्मेदार साबित हुआ,

तो गलती इसकी नहीं,

हम सबकी होगी..!!

जपणूक


प्रलोभनांच्या ताटाशेजारी,

धनदांडग्यांच्या पाटाशेजारी,

संमेलनाच्या गदारोळाभोवती

पुरस्कारांच्या मानधनाभोवती,

जातीधर्माच्या संवर्धनासाठी

बंदी,निषेधाला शमवण्यासाठी,

कवीने बांधू नये दावणीला

आपली काव्यप्रतिभा..!

पुढाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त

गल्लीतल्या समारंभानिमित्त,

‘पब्लिक’च्या हौसेखातर

‘भक्तांच्या’ इच्छेखातर,

कवितेची मागणी होते..

तेव्हा कवीने दाखवायला हवा

बाणेदारपणा

एका नम्र,करारी नकाराच्या रुपात..!

कविता म्हणजे उपासना,नव्हे केवळ शब्दांचा खेळ,

निसर्गाने सर्जनशीलतेला दिलेलं अनोखं वरदान..

युगायुगांच्या अक्षरांची अर्थपूर्ण रांगोळी..

हजार मौनांचं शाब्दिक भाषांतर..

मानवी स्फुल्लिंग पेटवण्याचं धारदार शस्त्र..

रसिकमनाच्या गाभाऱ्याला पडलेलं सुंदर स्वप्न..

त्याची जपणूक कविनेच करायला हवी,

अगदी तळहातावरल्या फोडा सारखी..!!

ती 

निळ्या निळ्या डोळ्यांचे

मिटणेही अपार अल्लद,

नजरेच्या कोमल बाणांचे

बरसणेही इतुके घातक..!

नुकत्याच उमलल्या ओठांचे

गाणेही मंद गुलाबी,

अन गोऱ्या देहावरचे

गोंदणही शुभ्र सुगंधी..!

अवखळ बटा कुंतलांचे

लोटणेही सुकुमार साजुक,

आभूषण नेसुनी नक्षत्रांचे

चालणेही पिसांपरी नाजुक..!

पुनवेला तळ्याच्या काठी

भेटण्यातही कंपित थरथर,

सलज्ज हळव्या स्पर्शाने

विरघळणेही तितुके झरझर..!

नात्याचं झाड

आताशा आपली भेट होत नाही

शेवटचं बोलणंदेखील फारसं स्मरत नाही,

आपल्या नात्याचं झाडही सुकत चाललंय…

उगवणाऱ्या मावळणाऱ्या प्रत्येक सूर्य चंद्राच्या साक्षीने

मरण प्रायः मौन धारण केलंय त्या झाडानं..

आतल्या तरल हिरव्या हळवेपणावर

चढवलं गेलंय सोशिकतेच्या खोडाचं रुक्ष चिलखत..

हसऱ्या आनंदी पानाफुलांची हवीहवीशी सळसळ

कुठल्याशा अज्ञात ऋतूचक्रात अडकून संपली आहे..

क्वचित एखाद्या सुन्न प्रहरी आठवांचे पक्षी येऊन

आर्त सुरात गात असतात विरहाची दुःख गाणी..

पूर्वीचा भरभरुन कोसळणारा पाऊस फिरकत नाही आता

ओसाडपणाचा शाप लाभलेल्या जर्जर शुष्क जमिनीकडे..

डोळ्यातल्या अश्रुंच्या शिंपणाने पोसतोय उरलासुरला जीव

कधी येणं झालंच,तर एखादी ओंजळ तुझीही लाभू दे

सुखा समाधानाने मरेल बिचारं आपल्या नात्याचं झाड..!!

रुतबा


एक जादू-सा अंदाज़ है..

नज़्में उसकी उंगली थामे चलती हैं,

तरानों को खुदी का एहसास कराता है,

किताबों की सफ़हे पलटने के शोर को

अपने चंद मिसरों में कैद करता है,

सरहदों पे होते हैं ख़ूँ कुछ ख़्वाबों के

तो ज़ख्म से कराहते हैं इसके अल्फ़ाज़,

शिकायत है किसी यार जुलाहे से,किसी तरक़ीब की,

तो किसी चुप से शायर की ख़ुदकुशी पे सवाल करता है,

ग़ालिब,अमृता,इमरोज के नाम अक़ीदत से

नज़्मों में पिरोकर और भी जाविदाँ करता है,

तपाता है दर्दों की दोपहर कोई,

ताकि रूह को छाँव मिले,कुंदन हो,

तसव्वुर के रंगों को कलम की स्याही में ढालकर

लगाता है चक्कर फलक,सय्यारों,क़ायनात के,

पूरनमासी के रात में,मद्धम आवाजों में

पुकारता है किसी हमनशीं हमदर्द को,

वक़्त के कैनवास पे उतारता है हर्फों की हसीन पोर्टरेट

तो सिर्फ इत्मीनान नहीं होता,रूह निहाल होती है,

चाँद को तो जैसे किराए पे ले रखा हो

या कभी यूँ लगे,की इसी की जागीर है वो सिक्का,

शफ़्फ़ाफ़ लम्हे जब खयालों के सुबुक लम्स पाते हैं

तो तामीर होती हैं इसकी कुछ नज़्में,जो मानी दें हयात को,

सफ़ेद उम्र,लिबास में,जब बयाँ करता है कोई ताज़ातरीन त्रिवेणी

गूँज उठता है समाँ,सन्नाटे को आवाज मिलती है,

न जाने कितनी नस्लें एहसानमंद होंगी इसकी

कितनी सदियों की जुबाँ पर इसके नज़्मों का लुत्फ़ रहेगा,

एक फरिश्ते जैसा रुतबा है इस सुखनवर का,

दुनिया इसे ‘गुलज़ार’के नाम से जानती है..!!!

समर्थ


नकोच उत्तर,

असू दे प्रश्नचिन्ह

थांबलेल्या घड्याळाच्या

टिकटिकीवर.

अनुभवू दे,

या वेळेत

साचून राहिलेल्या

क्षणांची उत्कटता.

पोहचू दे

पुसटश्या स्पर्शाची ओल

प्रत्येक पेशीच्या मुळापर्यंत.

साजरा होऊ दे उत्सव

लाटांना लागून राहिलेल्या

किनाऱ्याच्या आसेचा.

काळकक्षेच्या सीमेत

घुमू देत स्वैर

संगीताचे मोहक सूर,

गात्रा गात्रांना भिजवून

परतीला निघालेल्या

पावसासारखे,

घेऊ दे टिपून

मोकळ्या हातांनी

टपोऱ्या डोळ्यांनी

रात्रीच्या अंगणात 

लगडलेला चांदणचुरा,

यानंतर,

कुठल्याही उत्तराला

सामोरा जायला

मी समर्थ असेन..

कुठल्याही काळमर्यादेशिवाय!!

परचम


पहाड़ की चोटी पर पहुँचना

किसी हैरतअंगेज़ कारनामे से कम नहीं..

फिज़ाओं की साँस फूलने लगती है,

बर्फीली रातों के मौसम में तो

मुसलसल परेशानियाँ टपकती हैं,

परिंदों की उडानें सर्द हो जाती हैं,

सहर में दूधिया कोहरा अपने

करतब के खेल दिखाता है,

रगों में खूँ जम जाता है

दिल ओ दिमाग भारी लगता है,

फिसलनें औकात दिखाती हैं

गहरी खाई के बीचोंबीच

मौत की सहेली रहती है,

पर एक उम्मीद..

जिस्म पर जख्मों का बोझ लिए,

हौसले की चादर ओढ़े,

पार करती है मुश्किलें..

चोटी पर जिंदगी का

परचम लहराता है!

जिंदगी जीतती है!!

तगमग

उमटवून शुभ्र कागदावर

रेखीव अक्षरांची नक्षी

स्वस्थ राहता नाही येत मला

कवितेला कैद ठेवणं पाप वाटतं..

फेसबुकच्या भिंतीवर डकवली जाते

लाइक्सच्या कचाट्यात

कॉमेंट्सच्या गदारोळात

जीव गुदमरतो तिचा

भांबावून पाहते नुसती..

म्हणून मग ट्विटरवर पोचवतो

तिथेही रिट्वीट,फॉलोअर अन

फेवरिटचा उच्छाद असह्य होतो

शब्दांचा तळतळाट होतो तिच्या..

स्वारी चालते वर्डप्रेसवरच्या

ब्लॉगची गुळगुळीत वाट

का कुणास ठाऊक तिथलाही

चकचकीतपणा मनात भरत नाही तिच्या..

शेवटी थकून भागून येते परत

डायरीच्या कुठल्याशा पानावर विसावते

नीजभरल्या डोळ्यांनी सुखावून

हसऱ्या चेहऱ्याने शांत झोपी जाते..!!!

दरवर्षी


अगदी दरवर्षीप्रमाणे

मोहर येतो,

पालवी फुटते,

सेन्सेक्स कोसळतो,

खिसे फाटतात,

पुतळे जळतात,

दंगली होतात,

मुडदे पडतात,

आभाळ रडतं,

आत्महत्या होतात,

कुटुंब संपतं,

डोळे वाहतात,

अश्रु सुकतात,

लेखणी शहारते,

विषाद दाटतो,

हात थरारतात,

मने उसवतात,

सूर्य मावळतो,

अंधार कोसळतो,

लग्न होतात,

मुलं जन्मतात,

बेकारी वाढते,

दारिद्रय पसरतं,

रोग होतात,

संसर्ग संभवतो,

नद्या आटतात,

जमीन भेगाळते,

सिनेमे येतात,

गाणी वाजतात,

ऋतू बदलतात,

सत्ता पालटते,

अगदी तसाच

आपण सालाबादप्रमाणे,

स्वातंत्र्यदिन साजरा करतो..!!

A sip of coffee


No matter whether it’s cafe or home,

You’re my company,my license to roam!

When my eyes ask a nap for a while,

You’re the one,who brings out a smile!

Do you remember ‘her’&date on that eve,

Quite special moments,you offered to give !

Often we met,when sorrows had a day,

There’s a feeling that I needed to say!

Apart from colour,aroma and the taste,

Ur magic keeps me alive,makes me to quest!

Tell me the way to express feelings to you,

I wonder if you’ve even got a clue!!!