दरवर्षी


अगदी दरवर्षीप्रमाणे

मोहर येतो,

पालवी फुटते,

सेन्सेक्स कोसळतो,

खिसे फाटतात,

पुतळे जळतात,

दंगली होतात,

मुडदे पडतात,

आभाळ रडतं,

आत्महत्या होतात,

कुटुंब संपतं,

डोळे वाहतात,

अश्रु सुकतात,

लेखणी शहारते,

विषाद दाटतो,

हात थरारतात,

मने उसवतात,

सूर्य मावळतो,

अंधार कोसळतो,

लग्न होतात,

मुलं जन्मतात,

बेकारी वाढते,

दारिद्रय पसरतं,

रोग होतात,

संसर्ग संभवतो,

नद्या आटतात,

जमीन भेगाळते,

सिनेमे येतात,

गाणी वाजतात,

ऋतू बदलतात,

सत्ता पालटते,

अगदी तसाच

आपण सालाबादप्रमाणे,

स्वातंत्र्यदिन साजरा करतो..!!

Advertisements

6 thoughts on “दरवर्षी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s