नात्याचं झाड

आताशा आपली भेट होत नाही

शेवटचं बोलणंदेखील फारसं स्मरत नाही,

आपल्या नात्याचं झाडही सुकत चाललंय…

उगवणाऱ्या मावळणाऱ्या प्रत्येक सूर्य चंद्राच्या साक्षीने

मरण प्रायः मौन धारण केलंय त्या झाडानं..

आतल्या तरल हिरव्या हळवेपणावर

चढवलं गेलंय सोशिकतेच्या खोडाचं रुक्ष चिलखत..

हसऱ्या आनंदी पानाफुलांची हवीहवीशी सळसळ

कुठल्याशा अज्ञात ऋतूचक्रात अडकून संपली आहे..

क्वचित एखाद्या सुन्न प्रहरी आठवांचे पक्षी येऊन

आर्त सुरात गात असतात विरहाची दुःख गाणी..

पूर्वीचा भरभरुन कोसळणारा पाऊस फिरकत नाही आता

ओसाडपणाचा शाप लाभलेल्या जर्जर शुष्क जमिनीकडे..

डोळ्यातल्या अश्रुंच्या शिंपणाने पोसतोय उरलासुरला जीव

कधी येणं झालंच,तर एखादी ओंजळ तुझीही लाभू दे

सुखा समाधानाने मरेल बिचारं आपल्या नात्याचं झाड..!!

Advertisements

7 thoughts on “नात्याचं झाड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s