लसीकरण की राजकारण

मागच्या काही दिवसात कोविड,लसीकरण संदर्भात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातल्या काही प्रमुख मुद्दे

*मागील 24 तासात तब्बल एक लाख पंधरा हजार राहून अधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, हा आजवरचा देश पातळीवरचा उच्चांक आहे. तसेच महाराष्ट्रात बेड्स, रेमडेसिविर,ऑक्सिजन तसेच आवश्यक मनुष्यबळ यांचा भीषण तुडवडा निर्माण झाला आहे. जे डॉक्टर्स, कर्मचारी अव्याहतपणे काम करत आहेत, ते हा भार आणखी कितपत सोसतील, याविषयी काही सांगणं कठीण आहे.

*महाराष्ट्रात करोना लसीचे केवळ 14 लाख डोस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे दिवसाला पाच लाख डोस द्यायचं म्हटलं तर केवळ तीनच दिवस पुरणार आहे लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत – राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे

*काही राज्य सरकारे लसीकरणाच्या पुरवठा बद्दल पराकोटीचा तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती असल्याचं खोटं चित्र उभं करत आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणात आहे – केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन

*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी तसेच आय एम ए सारख्या संस्थेने 18 /25 वर्षे वयोगट पुढील नागरिकांना लक्ष देण्याची मागणी केंद्राला पत्राद्वारे केली आहे

*फुटकळ कारणे देऊन आरोग्य व्यवस्थेतील फ्रन्टलाइन वर्कर्स यांचं लसीकरण रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आलं आहे

*15 मार्च पर्यंत आपण देशात जेवढ्या लसी पुरवत होतो त्याच्या दुप्पट प्रदेशात पाठवत होतो सभागृहात आरोग्य मंत्र्यांनी दिलेली आकडेवारी होती- भारत देशात 5.94 कोटी लसी पाठवल्या तेव्हा देशात तीन कोटी लसी दिल्या गेल्या

*Pfizer कंपनीने देशामध्ये आपत्कालीन वापरासाठी पुरवठादार बनवण्याची मागणी आज मागे घेतली आहे

* 19 एप्रिल पासून अठरा वर्षापुढील प्रत्येक अमेरिकन नागरिकाला प्लस मिळेल – जो बिडेन

* मागच्या वर्षभराच्या लॉकडाऊन आणि तत्सम अनुभवाने शहाणे केल्यानंतर सेकंड वेव्ह चा इशारा जगभरातील तज्ञ देत असताना सत्ताधाऱ्यांनी नेमकी काय दक्षता घेतली,काय उपाययोजना केल्या, याविषयी काही माहिती कळू शकेल काय??


* सर्व पक्षांना त्यांच्या पक्षप्रमुखांना पक्ष कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती – सगळ्या प्रचार सभा निवडणुका संपल्या असतील तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला हरकत नाही. नंतर सगळं वसुली, खंडणी, दीदी ओ दीदी ,हिंदू-मुस्लिम, मंदिर- मस्जिद सुरू करता येईल, त्याबद्दल निश्चिंत रहा. काळजी नसावी, शेवटी आपला देश आहे.

* देशभरात आरोग्यव्यवस्थेची अशी अनागोंदी सुरू असताना ,ऐन ‘आरोग्य दिनाचं’ औचित्य साधून महामहीम प्रधानसेवक ‘ परीक्षा पे चर्चा’ नामक अतिशय महत्वाचा ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न हाताळत आहेत.

* आपणास आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!