लकीरें


पापा के जेब से पेन छीनकर,

दौडी चली जाती है गुड्डी

अपने कमरे में,

होमवर्क जैसी तमाम

बेहूदा बातों को छोडकर,

कापी के पिछले वाले कुछ पन्ने

फाडकर

मुस्काती हुई आँखों से,

लग जाती है कुछ अजीबोगरीब कारनामों में,

उगते हैं टेढ़े मेढ़े फूल कागज़ 

की जमीनों पर,

दो मंजिला स्कूल बनाकर पीछे

चश्मेवाले सूरज को टांगा जाता है,

उसकी सहेलियों के नाक कान चपटे हो जाते हैं,

तो टीचरें और भी मोटी..!

गुस्सैल कुत्ते की पूँछ को

फर्र से बडी कर के खिंचा जाता है,

किसी कोने के पेड़ पौधों को पानी

देते देते स्याही खत्म हो जाती है,

इसी बीच खिंची जाती हैं

कई लकीरें उसके

चेहरे-हाथों-पेशानी पे,

पर कोई इन्हें समेटकर 

पेंटिंग में सजाए,

तो मेरा दावा है,

पिकासो और अँजेलो ने

यकीनन आज हार मान ली होती…!!

जंगल

ऐसपैस पसरलेल्या साहित्याच्या जंगलात,

टिपून घ्याव्यात,

कादंबऱ्यांच्या जाडजूड झाडांवरल्या

भरीव खोडांवर कोरल्या गेलेल्या

राठ राठ संदर्भरेषा..

डेरेदार कथांच्या झाडांवर

दाटीवाटीने पहुडलेल्या वाक्यांच्या फांद्यांना

लगडलेली रसाळ अर्थांची फळे

मनसोक्त चाखावीत..

हळुवार हाताळाव्यात 

निरागस कवितांच्या नाजुक वेली

नुकत्याच फुललेल्या काव्यांच्या ओळी

अलगद ओंजळीत घेऊन श्वास सुगंधावा..

सहजच ओलांडाव्या मुळाक्षरांच्या पाऊलवाटा

भेदाव्यात भाषांनी आखलेल्या मर्यादारेखा

विविध लिपीतल्या अक्षरबिंदूनी निघावे न्हावून

अंकुरावे बीज पानातून मनात…

ऐसपैस पसरलेल्या या जंगलात,

अधोरेखित व्हावं..

जिवंत हिरवं माणूसपण,

शब्दांच्या सावलीत मिळालेल्या चिरनिद्रेसकट..!!

प्रायश्चित्त


एकवार माफ करेन स्वत:ला,

जर्द तांबडया प्रभात समयी

लालचुटूक पानांवरचे

चिंब ओलेते दवबिंदू

डोळ्यांनी प्राशन करायचे राहून गेल्यास….

किंवा हजारो उल्का,चांदण्या,ताऱ्यांना

चुकवत,ऐन पौर्णिमेच्या रात्री,

चंद्र माझ्या अंगणात पाऊल टाकतो,

तेव्हा त्याची दृष्ट काढायची राहून गेल्यास…

अथवा,उन्मत्त नभांच्या तांडवात

पारावरच्या शांत तेवणाऱ्या

कोवळ्या पणतीचा जीव व्याकुळ होतो,

तेव्हा उरातला अंगार तिच्या ओंजळीत

टाकायचे राहून गेल्यास…

मात्र,

जगाच्या रहाटगाड्यात,

केवळ क्षुद्र स्वार्थापोटी,

अलगद उमलून आलेल्या

शेकडो कवितांच्या गर्भपाताला,

कारणीभूत असल्यास..कसे माफ करणार??

या पापाचे प्रायश्चित्त सांगेल कुणी???

कैलेंडर


दीवार पे टंगा हुआ कैलेंडर..

कोई कैलेंडर नहीं लगता..

कोलाज लगता है

वक़्त की हुक़्मजदा कारागिरी का..!

लाल नीले लिबास पहने

तीस इकत्तीस तरह की

तारीखें कैद रहती हैं

सजाई हुई चौखट में,

कायनात के जिस्म को

जकड़ लिया है वक़्त ने,

सारे मौसमों को बाँट

दिया है महीनों में…!

आफ़ताब बेबस है

मेहताब की तरह,

कोई भी गड़बड़ की

आहट सुनाई दे,तो,

बस क़यामत आ जाए..!

इसके खौफ़ से,

सुबुक लम्सों की शामें

हल्के पाँव गुज़रती हैं,

तो हाँफता हुआ बेचारा सा दिन

डूब जाता है रात की कोख में..!

चौखट के कोनों में 

गूंदे गए स्याही के धब्बे..

चुपचाप पड़े रहते हैं

डरे,घबराए गुलामों की तरह..

एकाध बार मुँह दिखाई होती है..बस्स!

महीना ख़त्म होते ही

पलट जाता है एक पन्ना,

जैसे वक़्त ने नींद में

सय्यारों के तकीये पे

कोई करवट ली हो..!!!

काळोख

खैरलांजी..

दिल्ली..

कोपर्डी..

हिंस्त्र श्वापदांचं सावज स्त्रीदेह..

कुस्करलेल्या स्तन,योनी,मनाचा विलाप..

सडक्या विचारांची विकृत माथी..

त्वचेसोबत सोलवटुन निघालेलं आत्मभान..!

किंकाळ्यांनी भरून गेलेलं आभाळ..

नाकर्त्या समाजाचे फुटलेले डोळे..

शिसारी आणणाऱ्या घृणेचा कळस..

कोवळया कळ्यांचे मिटलेले थंड श्वास…!

अंधारून आलेल्या दिशांचे प्रहर..

जाणिवांच्या चौकटींना गेलेले तडे..

विमनस्क मनाची मूक आक्रंदने..

पुरुषी संवेदनांच्या अस्तित्वाची लाज…!

साचून राहिलेला शून्य काळोख..

मांस,रक्त,स्नायूंचा चिखल..

मुर्दाड आसमंताचे आटलेले अश्रु..

काळाच्या कागदावर षंढत्वाची ठसठशीत सही..!!!

लिबास


नीचे बिखरे पड़े

हरे लॉन को,

छाँव की चादर

पहनाता गुलमोहर का पेड़,

जब भी गिराता है

पकी हुई टहनियों से

सुर्ख़ रंगों के फूल…

यूँ लगता है की,

गाँव की किसी

बाली उमर की चंचल

लड़की ने पहना है

हरा लिबास..

और ओढ़ लिया है

लाल फूलोंवाला मलमली दुपट्टा..!

बारिश के मौसम में

जब पत्तों से टपकते आबशार

परेशाँ करते हैं लॉन के जिस्म को..

तब एक सवाल 

बार बार सर कुरेदता है..

उस लड़की के 

माँ बाप ने उसे क्यूँ

डाँट दिया?

रो रोकर लिबास 

गिला कर दिया..दुपट्टा बेहाल है..

या किसी बादलों सी आँखों वाली

सहेली के साथ उसका 

झगड़ा तो नहीं हुआ??

अश्वत्थामा

सुमारे पाच हजार वर्षांपासून,

कुठल्याशा निर्जन,निर्बिड अरण्यात

भटकत असलेल्या अश्वत्थाम्याला

हाताशी धरून,समोर बसवून,

विचारावे वाटतात काही प्रश्न..

तुझ्या जन्माची आख्यायिका..

दारिद्रयाचे चटके..पिठाचं दूध..

कपाळावरचा दिव्यमणी..

सारं काही खरं होतं का रे..

का नाही बोचत इतिहासाला

तुझ्यावर झालेला अन्याय..

आयुष्यभर धर्माज्ञेचं काटेकोर पालन

केलंय का कुणी तुझ्या इतकं..

निव्वळ एका रात्री झालेली दुर्बुद्धी 

नि ओढवलेला सर्वनाश..

आणि नव्हता करता आला उपसंहार

तुझ्याद्वारे सोडलेल्या ब्रह्मस्त्राचा..

त्यात तुझी चूक किती??

जन्मदात्या पित्याने शिकवलेली

अर्धवट विद्या नि पूर्ण शिक्षा तुला..

आणि नेमकं हेच का टिपलं गेलंय

या अजस्त्र कालखंडाच्या नोंदवहीत..?

का विसर पडतो जगाला

वेदशास्त्र संपन्न,विद्वत्तेचं मूर्तिमंत

उदाहरण असलेल्या पापभीरु अश्वत्थाम्याचा..

साऱ्या कलांमधे पारंगत असूनही

पित्याचं प्रेम कुणा शिष्यावरच जास्त आहे..

या जाणिवेचं शल्य कसं मोजणार कुणी..?

साक्षात धर्माचं नाव लावणाऱ्या ज्येष्ठ पांडवानं

अन जगन्नियंता असल्याचा आव आणणाऱ्या

मुरलीधराने कपटाने द्रोणांचा वध करविला..

त्या वेळची दुःखविदिग्धता

काळाचे काळीज चिरणारी नव्हती का..??

पित्याने सोडलेला प्राण ही

केवळ तुझ्यावरच्या प्रेमाची अनुभूती

असल्याचं कळल्यावर

कसल्या विचारांचं काहूर माजलं

असेल तुझ्या मनात..?

भाळावरचा दिव्यमणी छाटून टाकणाऱ्या

पार्थाच्या तलवारीने,त्या वेळी

उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसकट

इतिहासाची किती पाने रक्तरंजित केली आहेत..?

 त्या जखमेतून प्रवाहित झालेल्या

रक्त नि पूवाच्या नद्यांची संख्या तरी किती..?

युगंधराने तुला अमरत्वाचा शाप देऊन

तुझ्यातल्या दिव्यत्वाची केलेली क्रूर थट्टा

कुठल्या उ:शापाने दूर होणार आहे..?

जगभरातल्या शोकान्तिकांचा शेवट

तुझ्या भळभळत्या जखमेच्या

उल्लेखानेच होतो..तर..तर..

वैश्विक दुः खाच्या प्रतिकात्मकतेचं,

मूक आक्रोशाच्या विफलतेचं,

दुर्दैवी कारुण्याच्या संचिताचं,

रोगजर्जर देहाच्या व्याधींचं,

चिरंतन झालेल्या वेदनेचं…

नेमकं ओझं असतं तरी किती??

हे पुराणपुरुषोत्तमा…देशील उत्तर???

गिनती

ये बात और है

की काफी वक़्त गुज़र गया है..

कितने मौसम बीते हैं..

पेड़ों ने शाखों से न जाने

कितने पत्ते गिराए हैं..

कितने बार सूरज ने

उफ़क़ पे दस्तक दी है..

चाँद ने कितनी डुबकियाँ

लगायी हैं तालाबों में..

कौसों में कितने रंग अपनी 

निशानी छोड गए हैं..

शमाओं ने पलकों को

कितनी बार झपकाया है..

कितने दफे फलक ने जमीं पे

फेंक दी हैं बूंदों की मुहरें..

साहिल ने कितने दफे 

थपेड़ा है बिगड़े हुए पानी को..

कितने अल्फ़ाज़ नाराज़ हुए हैं

नज़्म ना लिखने से..

कितनी सांसों ने शिकायत की है

बगीचे के गुलाबों की..

कितनी बार भीगी हैं आँखें

कितनी दुआओं के खातिर..

जानम…

हमारी आखरी मुलाक़ात के बाद

इन सबका हिसाब किताब

दर्ज है डायरी में मेरे..

गर कुछ छूट गया है..तो..

मेरे तसव्वुर में तुम्हारे

आने की गिनती..

बस्स..नहीं गिन पाया मैं!!!

लाश

गली की पुरानी मस्जिद में,

वो बंदा अज़ान देता था,

आयतों को ज़ुबाँ पे रख के,

तक़रीर करता था जुमा के दिन,

उसकी आम बातों में भी हरदम

जन्नत दोज़ख का जिक्र रहता,

पेशानी पे काला धब्बा पड गया था

सिज्दों में झुक झुककर..

अकेला रहता था घर पे,

ना बीवी बच्चे,ना भाई बहन..

मोहल्ले के लोगों ने चंदा जमाकर

तनख्वाह पे रखा था..

बच्चों को क़ायदा कुरआन पढ़ाते पढ़ाते

बाल सफ़ेद ही हो गए थे..

रूहानी ताकतों की कहानियाँ

सुनाने में दिलचस्पी रखता था..

कल देर रात,

रास्ता पार करते  वक़्त

ट्रक के नीचे आ गया बेचारा..

न किसी ने उसकी रूह देखी,

न किसी ने फरिश्तों की आवाज़ सुनी,

कुछ ने कहा..उम्र का कुछ तो ख्याल किया होता..

कुछ ने कहा..अब मस्जिद का क्या होगा?

फिर सब चले गए..

आज सुबह..

म्यूनिसिपाल्टी की गाडी ने आकर

लाश को ठिकाने लगाया..

अब नए मौलाना की खोज जारी है…!!

एक रेषा

प्राक्तनातल्या गर्द छायेतले

अस्फुट धूसर ठिपके..

एकमेकांशी गप्पा मारतात,

तेव्हा,

तू शांतपणे ऐक..

त्यांच्या मनातला कल्लोळ,

पाहून घे..

त्यांच्या रंगांचा प्रवास,

स्पर्शुन घे..

त्यांच्या त्वचेतल्या सुक्ष्म जाणिवा,

अनुभव..

त्यांच्या हुंकारातला उद्वेग!

एवढ्या प्रतिसादावरून

तुझी ओळख पटली असेल,

तर,

विचारुन पाहा त्यांना…

कल्लोळ का नाही होऊ शकला,

नादमाधुर्याचं संगीत?

करड्या रंगाने का घेतलं वेढून

गुलाबी कोवळया छटांना?

का नाही उमजली त्यांना

ओलेत्या तारुण्याची निसर्गदत्त भाषा?

कुठल्या कारणाने नाही लागली

त्यांच्या अस्तित्वाला अर्थाची ओढ?

आणि हो,

सखे,

आणखी एक विचारशील?

का नाही होऊ शकली 

त्यांना जोडणारी 

सबंध एक रेषा???

कळू देत त्यांना,

त्या रेषेच्या दोन टोकांवर,

दोन जीव एकमेकांची वाट पाहत होते..!!!